भाजप नेत्याची गोळ्या घालून निर्घुण हत्या, घटना स्थळी नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण


उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भाजपचे नेते आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले माजी सरपंच यांची गोळ्या घालून करण्यात आली. या घटनेने खळबळ माजली आहे. हत्याच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या आठ दिवसांत हत्येच्या सात घटना घडल्याने गोरखपूरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर गावातील बृजेश सिंह यांची शुक्रवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. ते निवडणूक प्रचार उरकून आपल्या गावातून गोरखपूरला परत जात होते. ते आपल्या गावचे माजी सरपंच आणि भाजपचे सेक्टर प्रभारी होते. यावेळी ते सरपंचपदाचे प्रमुख दावेदार होते. गावात प्रचार उरकून रात्री ११ वाजता ते शहरातील आपल्या निवासस्थानी जात होते. त्याचदरम्यान गावाबाहेरच दबा धरून बसलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती कळताच खळबळ माजली. 

घटनास्थळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक पोहोचले. कुटुंबीयही गेले. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वीच जमिनीवरून प्रॉपर्टी डीलरसोबत वाद झाला होता. त्यामुळे त्या दिशेनेही तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुनील श्रीवास्तव आणि रामसमुझ या दोघांना अटक केली आहे. तर अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे. गोरखपूरमध्ये गेल्या आठ दिवसांत सात हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गोरखपूरमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments