महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन नाही?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी नुकताच संवाद साधला यावेळीही त्यांनी लॉकडाऊनची गरज बोलून दाखवल्यानं लॉकडाऊन आता होणारच असं मानलं जात आहे, मात्र राज्यातील जनतेला आता दिलासा मिळेल असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चिला गेल्याचं समोर आलं आहे.

सध्या सुरु असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊन लावण्याऐवजी निर्बंध लावण्यावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची सहमती झाली तर महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. सध्या तरी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार नाही?, अशी माहिती देखील आता समोर येत आहे. लॉकडाऊन लागल्यास त्याचा राज्याच्या अर्थचक्रावर मोठा परिणाम होतो. गेल्या वेळची परिस्थिती पाहता अर्थचक्र पुन्हा रुळावर येण्यास मोठा कालावधी लागतो आणि हातावर पोट असणारे तसेच मध्यमवर्गीय लोकांचं यामध्ये मोठे हाल होतात. त्यामुळे यावेळी लॉकडाऊन लावताना ठाकरे सरकार जपून पावलं टाकत असल्याचं दिसत आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी दोन दिवस मुख्यमंत्र्यांनी याच मुद्द्यावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मतं जाणून घेतली. बहुतांश लोकांची मतं ही लॉकडाऊनच्या विरोधातच आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये याबद्दल चर्चा सुरु आहे. पुण्यात जशाप्रकारे मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे, अशाप्रकारेच महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, मात्र मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सविस्तर माहिती समोर येईल.

Post a Comment

0 Comments