स्त्रीचा छळ कसा करायचा? कोरोना काळात पुरुषांनी गुगलवर साडेसोळा कोटी वेळा केलं सर्च


नवी दिल्ली:

आज जगातील कुठलीही माहिती हवी असेल, तर आपण गुगलचा आधार घेतो. अगदी चांगला पेन कुठला इथून ते चांगला बर्गर कुठे मिळतो, इथेपर्यंत माहिती सर्च इंजिनवर उपलब्ध होते. आता धक्कादायक माहिती समोर आली असून, तुम्हाला ही माहिती वाचून धक्का बसेल. कारण, पुरुषांनी गुगलवर चक्क कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित अनेक बाबी सर्च केल्या आहेत.   

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक राज्यात लॉकडाऊन लागू झाला आहे. ठराविक वेळेत, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही व्यवहार ठप्प आहे. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे सर्व व्यवसाय, उद्योगधंदे, कंपन्यांही बंद आहेत. या काळात लोक घरी आहेत. या दरम्यान, जगभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोव्हिड १९ काळात चक्क लोकांनी गुगलवर स्त्रियांचा छळ करण्याचे मार्ग शोधले आहेत. 

स्त्री-पुरुष दोघेही घरात आहेत. कधी- कधी एकमेकांमधील मतभेदामुळे लोक टोकाचाही निर्णय घेतात. यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित महिलांचे छळ करण्याचे छुपे मार्ग शोधले आहेत. या शोधासाठी त्यांनी चक्क गुगलचा वापर केला गेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'टेलर अँडफ्रान्सिस' या जर्नलमध्ये या संदर्भातला लेख प्रसिद्ध झाला आहे. गुगलवर २०२० मध्ये अशा बाबी गुगलवर शोधल्याचं या लेखामध्ये म्हटलं आहे.

कॅटरिना स्टँडिश यांनी स्टडी करून हा लेख लिहिला आहे. न्यूझीलंडमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ओटॅगोमध्ये' नॅशनल सेंटर फॉर पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीज'मध्ये त्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या आहेत. महिलांचा छळ आणि गेल्या वर्षीचा महामारीचा काळ यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. त्या आधारे त्यांनी हा लेख लिहिला आहे. 

अमेरिकेतून केल्या गेलेल्या गुगल सर्चचा या लेखामध्ये अभ्यास करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, असुरक्षितता, नैराश्य, हतबलता, हेतुपुरस्सरने केला गेलेला पुरुषी हिंसाचार या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments