सोलापूर! जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी शिवीगाळ केल्या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल


सोलापूर/प्रतिनिधी:

मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे महाराष्ट्र सचिव मनिष रविंद्र देशपांडे यांनी बार्शी येथिल भुयारी गटार कामात भ्रष्टाचारासाठी निकृष्ट दर्जाचे व चुकीचे काम तसेच बार्शितील रस्तावर वारंवार खड्डे बुजविण्यावर व रस्ता तयार करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला तरी रस्तावर खड्यांचे साम्राज्य या खड्यामुळे अनेक नागरीकांचे अपघात घडून कायमचे अपंगत्व आले तर काही मृत्यू ही झाले. या कामात झालेला भ्रष्टाचार याची चौकशी होवून दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी याकरीता मनिष रविंद्र देशपांडे यांनी मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, बार्शी नगरपरिषद व सोलापुर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना तक्रार दिली.

त्यावर कार्यवाही न झाल्याने संबधित प्रकरणी मा.लोकआयुक्त महाराष्ट्र राज्य यांना तक्रार केली.तसेच नागरीकांच्या सुरक्षित जीवन जगण्याच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत असलेबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे तक्रार केली असता मानवाधिकार आयोगाने राज्य मानवी हक्क आयोगाकडे ती पाठवली असून सदर प्रकरण ही न्यायप्रविष्ट आहे. 
      

दि.०९/१२/२०२० रोजी मा. राज्य लोकआयुक्त कार्यालयाकडून मनिष रविंद्र देशपांडे यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हाधिकारी सोलापूर यांनी स्वतः विधानपरिषद आणि विधान सभा यांच्या प्रश्नावली नुसार तात्काळ चौकशी करुन लोकआयुक्त कार्यालयाला अहवाल पाठवावा असे प्रत्र सोलापूर जिल्हा प्रशासनाला पाठवले होते. त्याची तक्रारीची प्रत लोकआयुक्त कार्यालयाकडून तक्रारदार यांना ही पाठवली होती.नमुद कालावधी संपल्यावर सदर पत्राप्रमाणे सोलापुर जिल्हा प्रशासनाने सदर लोकआयुक्त पत्राप्रमाने कार्यवाही केली का याबाबत चौकशी करणेकामी दि.०६/०२/२०२१ रोजी दुपारी ३ वाजता सोलापुर जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांना फोन केला असता व सदर लोकआयुक्त यांच्या पत्रावरील कार्यवाही बाबत विचारले असता व आपण लोकसेवक आहात असे बोलल्याने पंकज जावळे यांनी रागाने मणिष देशपांडे यांना शिविगाळ केली. 

लोकसेवकांनी संविधानातील अनुच्छेद १९ नुसार प्रश्न विचारण्यासाठी चौकशी कामी फोन केला व तुम्ही लोकसेवक आहेत असे म्हटल्याने शिवीगाळ केल्या प्रकरणी मनिष देशपांडे यांनी पुण्यात दत्तवाडी पोलिस ठाणे येथे तक्रार केली त्या तक्रारीवरुन भा.द.स.वि. कलम ५०७ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद झाला व सदर गुन्ह्याप्रकरणी न्यायालयातून दाद मागण्याची पोलिसानी समज देशपांडे यांना दिली. त्यावरुन मनीष देशपांडे यांनी मे. शिवाजीनगर,पुणे न्यायालयात दाद मागितली असून त्याची पुढील सुनावणी ७/५/२०२१ रोजी होणार आहे.भारतीय दंड संहिता कलम २१ नुसार शासनाचा प्रत्येक सेवक (शासकीय अधिकारी व कर्मचारी) हा प्रथमतः लोकसेवक असतो. प्रत्येक शासकीय कर्मचारी लोकांचा सेवक आहे .या देशातील गरीबातील गरीब व्यक्ती सुध्दा या देशाचा मालक आहे. 

तरीही अधिकारी कर्मचारी स्वतः मालक समजून भारतीय नागरिकांना नोकर समजतात आणि तशी वागणूक देत आहे ही चिंतेची बाब आहे. ज्यावेळेस भारतातील लोकांना समजेल की आपण मालक आहोत व अधिकारी कर्मचारी सेवक त्यावेळेस व्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही अशी भावना मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे महाराष्ट्र सचिव मनिष देशपांडे,जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय चे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक इब्राहीम खान, इनक्रेडिबल इंडिया चे अध्यक्ष असलम बागवान,बार्शी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर व आकाश दळवी या पदाधिकारी यांनी पत्रकार परीषेद मध्ये दिली आहे.

Post a Comment

0 Comments