सोलापूर हादरलं! हळद उतरली नाही तोच वाहिला रक्ताचा पाट


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूरमधील डोणगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नुकतंच लग्न होऊन सुरु झालेल्या संसारामध्ये पतीचे हात त्याच्याच पत्नीच्या खूनाने रंगले आहेत. डोणगावामधील रहिवासी असणाऱ्या गणेशचा नुकताच अमृता नावाच्या एका तरुणीशी विवाह झाला होता. मात्र संशयामुळे गणेशने त्याच्या पत्नीचा खून केला असल्याचं उघड झालं आहे .

लग्न होऊन दोन महिने देखील पुर्ण झाले नव्हते. त्यातच गणेश आणि अमृतामध्ये वाद सुरू झाला होता. आरोपी गणेश आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शुक्रवारीसुद्धा याच विषयावरून त्यांच्यात जोरदार भांडण झालं. त्यानंतर गणेश आणि अमृता यांचा वाद इतका टोकाला गेला की त्याने आपल्या पत्नीवर म्हणजेच अमृतावर कुऱ्हाडीने वार केला. कुऱ्हाडीच्या आघाताने अमृता जागीच ठार झाली. दरम्यान, या घटनेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर गणेश बंडगरने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

Post a Comment

0 Comments