मंगळवेढा! पतीचा अनैतिक संबंधातून खून, पत्नीसह दोघा जणांना आजन्म कारावास..


मंगळवेढा/प्रतिनिधी:

मंगळवेढा तालुक्यातील हुलजांती येथे अनैतिक संबंधास अड येणाऱ्या पतीस पत्नीने प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने खून केला होता. पती सिद्धाप्पा धोंडाप्पा कोठे यांच्या खून प्रकरणीत कमळाबाई कोठे, प्रियकर दीपक मेटकरी व त्याचा मित्र रामचंद्र पेटरगे या तिघांना आजन्म कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पंढरपूर येथील अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बावीस्कर यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.

तिन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा....

मंगळवेढा तालुक्यातील हुलजांती येथे २६ एप्रिल २०१४ साली सिद्धाप्पा धोंडाप्पा कोठे याचा डोक्यात, कानावर व डोळ्यावर वार करीत खून केल्याची घटना घडली होती.  याप्रकरणी मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण व एस. एस. कोळे यांनी तपास केला. पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. साक्षीदारांच्या साक्षी व पुरावे याचे अवलोकन करून न्या. चकोर श्रीकृष्ण बावीस्कर यांनी तीनही आरोपींना आजन्म कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

अनैतिक संबंध आड येणाऱ्या पतीची खून

सिद्धाप्पाची पत्नी कमळाबाई कोठे हिचे दीपक मेटकरी याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्‍न झाले. त्या दोघांच्या संबंधास सिद्धाप्पाचा अडसर होता. यातून वादही झाला होता. यामुळे कमळाबाई व दीपक मेटकरी यांनी सिद्धाप्पाचा काटा काढायचा प्लॅन केला. त्यासाठी दीपकचा मित्र रामचंद्र पेटरगे यालाही सोबत घेतले. तिघांनी सिद्धाप्पा बेसावध असताना डोक्यात, कानावर व डोळ्यावर वार करून त्याचा खून केला होता.

Post a Comment

0 Comments