पंढरपूर/प्रतिनिधी:
भारत भालके यांच्या अचानक जाण्याने पंढरपूर तालुक्यातील पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादी कडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके तर भाजपकडून गेल्या विधानसभा निवडणुकीला तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार पवारांच्या घरातील असल्याच्या चर्चा जोरदार रंगत होत्या, मात्र पवारांनी भगीरथ भालके यांची निवड केली आणि भाजपची धाकधूक वाढली.
दोन्ही उमेदवारांनी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना पंढरपूरमध्ये बोलवून सभा घेतल्या, आणि प्रचाराला सुरुवात केली. समाधान आवतडे व प्रशांत परिचारक एक होऊन पवारांच्या पैलवानाला पाडण्यासाठी रिंगण आखले तर एकीकडे भारत भालके यांनी केलेल्या कामांच्या जीवावर विरोधी दोघांना चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीचा लंगुट बांधला. म्हणतात ना शरद पवारांनी जर एखाद्या जागेवर गेम अखला तर विरोधी नेत्याला राजकारणातून राजीनामा दिल्या शिवा सोडत नाहीत.
याप्रमाणे पंढरपुर पोट निवडणुकीसाठी पवार मास्टरमाईंड वापरणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील काही गावपातळीवरील नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. तसेच आवतडे यांच्या गटातील बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे खात्रीलायक वृत्त सामोरं येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवार भाजपला चितपट करणार का? याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
0 Comments