बार्शी/प्रतिनिधी:
आझाद चौक, खुडे बोळ येथील रहिवाशी रामचंद्र ढोले यांच्या घरासमोर लावण्यात आलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिली. त्यामध्ये, पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
घराबाहेरुन काहीतरी जळत असल्याचा वास येऊ लागल्याने रामचंद्र ढोले आणि त्यांच्या पत्नी दरवाजा उघडून घराबाहेर आले असता, त्याचक्षणी गाडीच्या टाकीचा स्फोट झाला. त्यामध्ये, पती पत्नी दोघेही भाजून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मध्यरात्री खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रामचंद्र ढोले आणि त्यांच्या पत्नी ज्योती रामचंद्र ढोले अशी जखमींची नावे आहेत. रामचंद्र ढोले हे चांडक यांच्या मारुती रोप्स कंपनीत मॅनेजर आहेत. त्यामुळे, या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
मध्यरात्री २ च्या सुमारास सदरची घटना घडली. शेजारील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर, जखमींना उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी सर्वप्रथम बार्शी पोलिसात माहिती देण्यात आली असून पोलिसांनीही घटनास्थळाला भेट दिली आहे.
0 Comments