...म्हणून समाधान आवताडेंना पाठिंबा दिला- आमदार प्रशांत परिचारक


मंगळवेढा/प्रतिनिधी :

 ‘‘विरोधी उमेदवाराच्या विरोधात असणारी मते ही जवळपास दीड लाख आहेत. म्हणून, आम्ही  दोघे (प्रशांत पारिचारक आणि समाधान आवताडे) स्वतंत्र लढून मतविभागणी करण्यापेक्षा मी उभारलो, तर आवताडेंनी मला मदत करायची आणि आवताडे उभारले तर मी त्यांना मदत करायची, अशा भूमिकेतून आम्ही मतविभागणी टाळण्यासाठी एकत्र आलो आहोत,’’ अशा शब्दांत आमदार प्रशांत परिचारक यांनी आवताडे यांना पाठिंबा देण्यामागची खेळी उघड केली. 

भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर पोटनिवडणुकीचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिरात करण्यात आला. त्यावेळी आमदार परिचारक बोलत होते. या वेळी उमेदवार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, संचालक सचिन शिवशरण आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments