मोबाईलमध्ये गुंग होती नर्स, फोनवर बोलता बोलता दिल्या कोविडच्या दोन लसउत्तर प्रदेशमध्ये एका नर्सचा हलगर्जीपणा समोर आला आहे. फोनवर गुंग असलेल्या नर्सने एका महिलेला कोविडच्या दोन लसी दिल्या. जेव्हा महिलेच्या नातेवाईकांना ही बाब कळाली तेव्हा त्यांनी तातडीने रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली.

 एक नर्स सातत्याने फोनवर बोलत होती. नर्स अर्चना यांनी कमलादेवी यांना एक कोविड प्रतिबंधक लस टोचली आणि त्यांना काहीच सांगितले नाही. लस टोचतानाही अर्चना फोनवर बोलत होत्या. नंतर अर्चना यांनी पुन्हा कमलेश देवी यांना आणखी एक लस टोचली. कमलेश देवी यांना आपण आधीच् लस टोचली आहे हे अर्चना यांच्या लक्षातच नाही. जेव्हा कमलेश देवी यांनी विचारले की कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस एकदाच दिले जातात का? त्यावर अर्चना यांनी सांगितले की नाही कोविड प्रतिबंधक लसीचा एकच डोस दिल जातो.

ही बाब जेव्हा कमलेश देवी यांच्या कुटुंबीयांना कळाली तेव्हा यावर नाराजी दर्शवली तसेच नर्स अर्चना यांची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केली. या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. कमलेश देवी यांची प्रकृती स्थिर असून ज्या दंडावर लस टोचण्यात आली तिथे सूज आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्यावर डॉक्टर निगराणी ठेवून आहेत असेही कुटुंबीयांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments