अभिनेत्री परिणिती चोप्राचा टाॅपलेस फोटो पाहून चाहते म्हणाले…


परिणीती चोप्राचा ‘सायना’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला मात्र या चित्रपटातील परिणीतीच्या अभिनयाचं चाहत्यांसह सगळ्यांनीच कौतुक केलं आहे. सध्या परिणीतीचा टाॅपलेस फोटो प्रचंड चर्चेत आहे.

फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरची प्रतीक्षा सर्वांनाच असते. त्यांचे फोटो भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. डब्बू रत्नानींच्या कॅलेंडरमध्ये अभिनेत्री सनी लिओनी, कृती सेनन, पासून ते कियारा अडवाणीपर्यंत सगळ्या अभिनेत्रींनी टॉपलेस फोटोशूट केलं आहे. आता ‘सायना’ गर्ल अभिनेत्री परिणीती चोप्राचंही नाव या यादीत सहभागी झालं आहे.

फोटोग्राफार डब्बू रत्नानी यांनी परिणीती चोप्राच्या या बोल्ड लूकचा फोटो इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. परिणीती या फोटोमध्ये टॉपलेस दिसत आहे. या फोटोमध्ये परिणीती चोप्रा एका सामान वाहून नेण्याच्या हातगाडीमध्ये बसलेली आहे. या फोटोमध्ये परिणीती चोप्राचे फक्त खांदे आणि पायच दिसत आहेत. तिचा हा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. काहींनी परिणीतीचं कौतुक केलं आहे, तर काहींनी ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ असं म्हणत ट्रोल केलं आहे.

दरम्यान, परिणीतीचा हा फोटो शेअर करताना डब्बूने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘हीच युवर वॅगन टू अ स्टार’. तर डब्बू रत्नानींच्या कॅलेंडरमध्ये त्यांनी अजून कोणाकोणाला स्थान दिलं आहे, याकडं सगळ्यांचं लक्ष लागल आहे.

 

 

Post a Comment

0 Comments