...म्हणून नवऱ्यानेच तिचा अश्लिल व्हिडीओ काढुन केला सोशल मिडियावर व्हायरल


नागपूर: नवऱ्यानेच आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून तो फेसबुकवर व्हायरल केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे.  कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं, पण विश्वासाला तडा गेल्यास त्यात कोणताही रस उरत नाही. असंच काहीसं या प्रकरणात घडलं आहे.

सुरेश लक्ष्मीचंद सुमन असं आरोपीचं नाव असून त्याने आपल्या पत्नीशी पटत नसल्याने बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्यावरून आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ व फोटो अपलोड करायला सुरुवात केली. आरोपी आपल्या पत्नीसोबत राजस्थानमधील कोटा येथे राहत होता. परंतु सारखे भांडण होत असल्याने पत्नी त्याला सोडुन नागपूर येथे राहायला आली.

 काही दिवसांपूर्वी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या पत्नीने नागपुरमधील यशोदानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ३७ वर्षाच्या सुरेश लक्ष्मीचंद सुमन या इसमाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणात पत्नीशी पटत नसल्याने तिची बदनामी करण्याच्या हेतूने सुरेशने हे घाणेरडं कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

Post a Comment

0 Comments