सोलापूर जिल्ह्यातील "या" तालुक्यात कोरोनाची चिंताजनक स्थिती, दुसऱ्या लाटेच्या ग्रामीण भागाला झळ


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. आज कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येसह मृत्यूचं तांडव पाहायला मिळत आहे. पंढरपूर तालुक्यात  आज दिवसभरात ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यात गेल्या २४ तासांत २९९ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बार्शी, माढा, माळशिरस, करमाळा, मंगळवेढा तालुक्यात कोरोना चिंताजनक होताना दिसत आहे. जिल्ह्यातून ८९१ जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर या चार तालुक्यात १०कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. १० हजार ४५१ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. 

पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा तालुक्याची परिस्थिती चिंताजनक

सोलापूर जिल्ह्यातील अर्धे पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या चार तालुक्यांमध्ये सुमारे सहा हजार आसपास रुग्णही उपचार घेत आहेत. पंढरपूर तालुक्यात पाठोपाठ माळशिरस तालुका हा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक म्हणजे दोन हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल माढा तालुक्यामध्ये अठराशे रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार दिले जात आहेत. त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये पोट निवडणुकीनंतर कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये २७०० च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे प्रशासनासमोर साखळी तोडण्याचा मोठे आव्हान असणार आहे.


शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची प्रादुर्भाव जास्त..

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ ग्रामीण भागाला बसताना दिसत आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये नेत्यांच्या सभेला गर्दी होणारी ही ग्रामीण भागातील होती. त्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचे ॲक्टिव रुग्ण आढळले आहेत. तर माळशिरस सांगोला माढा करमाळा या तालुक्यात ग्रामीण भागापर्यंत कोरोनाने आपले हात-पाय पसरले आहेत. आज झालेल्या अहवालानुसार ग्रामीण भागात ११०४ रुग्ण नवीन बाधित झाले आहेत तर शहरी भागांमध्ये २०४ कोरोना रुग्णांना लागण झाली आहे. यातूनच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात मृत्यूदरही जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments