पंढरपूर/प्रतिनिधी ;
सोलापूर जिल्यात सध्याच्या काळात निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे.पंढरपूर पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त रित्या माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी एक इसमासह हातभट्टी दारू ताब्यात घेतली आहे .
पत्र्याचे टपरीच्या पाठीमागे चोरून हा.भ दारुची विक्री करीत होता अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली असता पोलीस त्या ठिकाणी गेले असता तेथे एक इसम पत्र्याचे टपरीचे पाठीमागे आपल्या समोर एक प्लँस्टीक कँन घेवून बसलेला पोलिसांना दिसला.
त्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला असता पोलिसांनी त्या व्यक्तीस जागीच पकडले त्याचे जवळील प्लँस्टीक कँन्ड तपासुन पाहता त्यामध्ये खालील वर्णनाचा प्रोव्हीशन माल मिळुन आला तो.. ५६०/- एक पांढरे रंगाचे प्लँस्टीक कँन्ड त्यामध्ये ७ लिटर अंबट उग्र घाण वासाची ह.भ दारू कि अं ———– ५६० /- येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्हीशन गुन्हयाचा माल मिळुन आला ते सर्व पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे नामे नवनाथ हरि रितोंड वय ४५ वर्षे रा. रोपळे ता.पंढरपूर यांचे विरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .पोलीस या प्रकारची कारवाई सुरू ठेवतात, की पूर्णविराम देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments