१९७१ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या ‘तुरुंगात’ ठेवण्यात आले? RTI दाखल..!पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दोन दिवसांपासून बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या ५० व्या स्वतंत्र दिना निमित्त पंतप्रधान उपस्थीत होते, त्यावेळी त्यांनी भाषण केलं आहे. ते म्हणाले की बांगलादेशच्या स्वतंत्र्यलढ्यात मी ही सहभागी होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षाचा होतो. मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. त्यावेळी मला अटक होऊन कारावासही भोगावा लागला होता. असा दावा मोदींनी केला आहे.

यावर काँग्रेसचे सोशल मीडिया सर्वेसर्वा असणारे सरल पटेल यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. अशी माहिती त्यांनी ट्विट करून यावेळी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती, व ते कोणत्या कारागृहात होते. ही माहिती जाणून घेण्याची मला उत्सुकता लागली आहे. असे पटेल यांनी सांगितले आहे. त्यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत RTI अर्ज दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments