"विद्यार्थ्यांनी देश व माता-पित्यांच्या सन्मानार्थ एक कर्तुत्ववान व जबाबदार व्यक्ति बनण्यासाठी NSS मध्ये सामील व्हावे : पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

 जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्रमाणपत्र वितरण समारंभ व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
        
जयसिंगपूर कॉलेजमध्ये प्रथमच  अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजनेच्या झेंड्याचे ध्वजारोहण जयसिंगपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  सिनिअर अंडर ऑफिसर शुभांगी ठोंबरे हिच्या नेतृत्वाखाली NSS  troop सज्ज करण्यात आला. यावेळेस झेंड्याला सलामी देऊन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या सन्मानार्थ मानवंदना देण्यात आल्या. हे सर्व पाहून श्री. बोरीगिड्डे साहेब आनंदी झाले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व युवा नेतृत्व प्रा. अभिजीत अडदंडे, प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार व कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर माने,डॉ. महादेव सुर्यवंशी, प्रा. मेहबूब मुजावर व कॅम्पस अँम्बेसिडर जीवन आवळे उपस्थित होते.
    
 यानंतर एन.एस.एस प्रमाणपत्र व विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रारंभिक कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून या कार्यक्रम आयोजनाचा हेतू सविस्तरपणे मांडताना ते म्हणाले की, एन.एस.एस.च्या माध्यमातून हे स्वयंसेवक विद्यार्थी अनेक गोष्टींचा त्याग करून पूर्णपणे राष्ट्रीय सेवा योजनेसाठी झोकून सामाजिक काम करीत असतात त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दोन वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर अशा स्वयंसेवकांचा मान सन्मान करणे हे खूप महत्त्वाचे असून यासाठी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून  स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
        जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व कार्यशील पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी  ज्ञानार्जनाबरोबर  माता-पित्यांच्या सन्मानार्थ एक कर्तुत्ववान व जबाबदार व्यक्ति बनण्यासाठी  NSS सारख्या राष्ट्रीय संघटनेमध्ये सामील व्हावे. यापुढे ते म्हणाले आज सामाजिक व्यक्तिमत्त्व बनवण ही काळाची गरज असून यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हे सर्व शक्य आहे. या वयात बेजबाबदारपणे बेगडी प्रेमाच्या जाळ्यात आजची तरुण पिढी अडकत असून यासाठी आपण सर्वांनी डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे. यासाठी बोरीगिड्डे साहेबांनी विद्यार्थ्यांना वास्तववादी उदाहरण देऊन  ते पटवून सांगण्याचा प्रयत्न केला तसेच सरतेशेवटी विद्यार्थिनी गेल्या दोन वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा मनसोक्त कौतुक केले. आजच्या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा  सक्रिय सहभाग पाहून ते आश्‍चर्यचकित झाले.
      
 यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी भाग्यश्री लिगाडे, स्वरुप सुर्यवंशी, कु.गौरा हंकारे व सौरभ शेट्टी या विद्यार्थ्यांनी आपले हृदय स्पर्शी मनोगते व्यक्त केले. यानंतर NSS पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक बोरीगिड्डे व अध्यक्ष प्रा. अभिजीत अडदंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले यावेळेस विद्यार्थ्यांचे मन आनंदाने भरून आले होते.
      
 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणारे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य व जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,जयसिंगपूर चे प्रा.अभिजीत अडदंडे यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले की, या राष्ट्रीय सेवा योजनेचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपले करिअर बनविण्यासाठी करावे.चंगळवादी जीवन जगण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी व्यवहारवादी जीवन जगावे.तसेच NSS चे विद्यार्थी हे इव्हेंट मॅनेजमेंट कार्याबरोबर रचनात्मक कार्य करीत असून हे देशाच्या विकासाचे उत्तम फलित आहे त्यामुळे बलशाली भारत बनण्यासाठी अशा स्वयंसेवक विद्यार्थ्यांची गरज आहे  असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.
       या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जीवन आवळे यांनी केले. तसेच पहिल्या प्रयत्नातच उत्तम सुत्रसंचालक म्हणून शुभांगी ठोंबरे व भाग्यश्री लिगाडे यांनी आपली भूमिका पार पाडली.  या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन एन. एस.एस.विद्यार्थी प्रतिनिधी गणेश कुरले,मंथन महिंद,श्रेया कोरे,आरती मडीवाल, विक्रांत माळी,आदित्य पाटील ऋषीकेश गवळी व अन्य स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्तम पद्धतीने केले. त्यांच्या या सर्व कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.मेहबूब मुजावर व जीवन आवळे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments