"जयसिंगपूर कॉलेजमध्ये प्रा.आ.केंद्र व N.S.S.व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने 'राष्ट्रीय जंत मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत औषधाचे वाटप"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:

राष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने राष्ट्रीय जंत मोहिमेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्राध्यापक, शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी प्रशिक्षणाचा आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार जयसिंगपूर कॉलेजमध्ये जंत निर्मूलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले.
         
जयसिंगपूर केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिलेल्या प्रशिक्षणानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र,राष्ट्रीय सेवा योजना व जयसिंगपूर कॉलेज माजी विद्यार्थी अल्युमिनी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ११वी व १२ वी आर्ट्स, कॉमर्स व सायन्सच्या विद्यार्थ्यांना जंत निर्मूलन करण्यासाठी औषध वाटप करण्यात आले.
      
 सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना म्हणाले की,संपूर्ण देशात राष्ट्रीय जंत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्या शिबीराचा एक भाग म्हणून १ मार्च ते ८ मार्च या कालावधीत १ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी जंताचे औषध वाटप वाटप करण्याचे नियोजन करण्यात आला आहे.यामुळे विद्यार्थी आरोग्यपूर्ण व सुदृढ होणे गरजेचे असून यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य व्यवस्थित रहावे व ते जागृत रहावेत हा हेतू होता.
         कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी राष्ट्रीय जंत मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध सखोल मार्गदर्शन करून वर्षातून दोन वेळेस या गोळ्यांचे सेवन करावे व स्वतःचे आरोग्य व्यवस्थित ठेवावे याबाबत त्यांनी भाष्य केले. तसेच जंत कृमीचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम याबाबत त्यांनी वास्तविक माहिती देऊन विद्यार्थ्यांना उपकृत केले.
    
त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.भरत आलदर व माजी विद्यार्थी अल्युमिनी संघटनेचे खजिनदार प्रा.डॉ. महावीर बुरसे यांनी ही विद्यार्थ्यांना गोळ्यांच्या सेवन करण्याबाबत जागृत केले.
         
यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना गुरुवार दि.४/३/२०२१ रोजी सायन्स विभागातील सर्व विद्यार्थ्यांना व शुक्रवार दि.५/३/२०२१ रोजी आर्टस,   कॉमर्स व कॉम्प्युटर विभागातील सर्व विद्यार्थ्यांना  उत्तम व शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती सांगून  औषधाचा वाटप करून त्यांना या गोळ्या चावून खाण्यास सांगण्यात आले त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्याचे पालन केले. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या मोहिमेस उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे शासनाचा असलेला हेतु व आखलेला कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला.
     
 हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना लाभदायी होण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर माने, उपप्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे, कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम,उपप्राचार्य प्रा.सौ.एम.एस.पाटील, पर्यवेक्षक प्रा. भरत आलदर, प्रा.डॉ.महावीर बुरसे, प्रा.सुनील चौगुले,प्रा.बाळगोंडा पाटील,प्रा.बी.ए.पाटील,प्रा.सुशांत पाटील,प्रा.शितल पाटील,प्रा.सौ. अंजना चौगुले,प्रा.संदिप परीट,प्रा. पवार,प्रा.मुकुंद पारीशवाड, प्रा.सौ.स्वाती बस्तवाडे,प्रा.यसादे व प्रा.मेहबूब मुजावर, जीवन आवळे, गणेश कुरळे, विक्रांत माळी,गुलाब माळी व अन्य स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
         
 त्याचबरोबर या कोरोना व्हायरस बाबत जागृत राहून सर्वांनी तोंडाला मास्क लावून,सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करून जंत कृमीचे औषध देऊन हे राष्ट्रीय काम प्रामाणिकपणे पार पाडले आहे.डॉ. पांडुरंग खटावकर व त्यांच्या टीमच्या सहकार्यामुळे हे राष्ट्रीय शिबिर यशस्वीपणे पार पडले.
      
या राष्ट्रीय कार्यास कोरोना योद्धा अर्थात प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक डी.बी.गायकवाड, एस.एस.आलासकर, वर्षा खटावकर, वनिता काटकर,मिनिता अहिरे ,सुनिता भालेराव व इतर सर्व कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments