पत्रकार धिरज शेळके आणि बेलगाव युवकांच्या माणुसकीने वाचविले अनोळखी वृद्ध महिलेचे प्राण ..


( बार्शी ग्रामीण पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाचे विशेष सहकार्य )

बार्शी/प्रतिनिधी:

एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ...
बेलगाव येथे गेल्या दोन दिवसापासून भुकेने व्याकुळ झालेल्या आणि शरीर पृक्रती खालावलेल्या अनोळखी आज्जीला दवाखान्यात उपचारासाठी दखल करून खऱ्या अर्थाने माणुसकीचे ज्वलंत उदाहरणं पत्रकार धिरज शेळके आणि बेलगाव येथील युवकांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 

गेल्या दोन दिवसापासून बेलगाव परिसरामध्ये एक आज्जीबाई एकाच ठिकाणी झोपून असून त्यांची पृकृती अतिशय खालावली असल्याची घटना गावातील युवकांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक - पत्रकार संघांचे बार्शी तालुका सहसचिव पत्रकार धिरज शेळके यांना फोनद्वारे कळवताच धिरज शेळके यांनी त्या आज्जीला बार्शीला घेऊन येण्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब शेळके यांनी युवकांना आधार आणि प्रेरणा देत बार्शीला घेऊन जाण्याचे सांगताच, बार्शी येथील चांडक इंडस्ट्रीज मध्ये कामाला असणारे गावातील तरुण नुकतेच कामावरून घरी आलेले असताना त्यांनी रोहिदास भालेराव यांच्या ओमिनी व्हॅन मधून अमित जगदाळे, बाळासाहेब कांबळे, दादासाहेब शेळके, ज्ञानेश्वर जगदाळे, अक्षय पवार यांनी रात्री ११.३० वाजता बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनला घेऊन आले. यावेळी पत्रकार धिरज यांनी अनोळखी व्यक्तीची नोंद करून त्यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयामध्ये दखल करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी वर्दीतली माणुसकी दाखवत, ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्याचे आदेश आपल्या पोलीस सहकार्यांना दिले. 
बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार प्रदीप केसरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोन्दर, होमगार्ड शिवाजी कर्नावळ, शिवाजी शिंदे, सुशील बंगाळे यांच्या सहकार्याने त्या महिलेस त्वरित बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री १२.१५ ला दाखल करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. शितोळे यांना सदरील घटनेची माहिती देताच त्यांनी तपासणी करून त्वरित उपचार चालू केले. रात्री १ वाजेच्या सुमारास उपचारादम्यान सदरील आज्जींची पृकृती व्यवस्थित असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आल्यावर  सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळू लागला होता आणि एका वृद्ध महिलेचे जीव वाचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं होते. 
या दरम्यान पत्रकार धिरज शेळके यांनी गौडगाव येथील निवारा अनाथाश्रमाचे संचालक राहुल भड यांना ही माहिती सांगताच, त्यांनी देखील आपल्या अनाथालयामध्ये या महिलेस सांभाळण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक - पत्रकार संघटनेचे तालुका सहसचिव पत्रकार धिरज शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि बेलगाव येथील युवक यांच्या केलेल्या माणुसकीच्या कार्याबद्दल बार्शी तालुका आणि परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पत्रकार धिरज शेळके यांनी या घटनेदरम्यान सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानत अशीच समाजसेवा करत राहणार असल्याचे यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments