"विज्ञान,तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळाचा वापर करून देश प्रगतीपथावर शक्य:प्रा.डॉ.गोविंद कोळेकर"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:

रुकडीच्या राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र विवेक वाहिनीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान  दिनाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
           
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. लता मोरे यांनी केले.  शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांना २८ फेब्रुवारी १९३० ला  रामन इफेक्ट साठी नोबेल पारितोषिक प्राप्त झाले.  मात्र १९८७ पासून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. शास्त्रज्ञ रमण यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या कार्याचा ही आढावा त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्र वाहिनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. 
        
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व साधन व्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठ रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ. गोविंद कोळेकर हे मार्गदर्शन करताना म्हणाले की,स्वातंत्र्यानंतर भारतात वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती वर भर देण्यात आला. त्यामुळे देशातील गरिबीचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली.तांत्रिक प्रगतीमुळे संकरित बी-बियाणे,खते व कीटकनाशके उपलब्ध झाली,  त्यामुळे शेती विकसित होऊन देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला या शिवाय औद्योगिक उत्पादनामुळे लोकांच्या विविध गरजा पूर्ण झाल्या. भारतामध्ये मुबलक प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या मनुष्यबळाचा वापर करून देशाला प्रगतीपथावर पोहोचविता येईल. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे भारतासह संपूर्ण देशात विकासाची क्रांती घडून आली आहे, परंतु वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचली आहे त्याचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीला भोगावा लागत आहे. पण विज्ञानाच्या साह्यानेच या समस्येवर मात करून पर्यावरण प्रदूषण या सारख्या समस्या दूर करता येतील व संपूर्ण सजीव सृष्टीला पुन्हा आनंदाने जीवन जगता येईल.डॉ. कोळेकर यांनी भारतातील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीचा आढावा घेतला. पर्यावरण प्रदूषणावर काय उपाययोजना करता येतील याची सविस्तर माहिती आपल्या व्याख्यानात दिली. 
        
 राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते. अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले की, प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात अनेक प्रश्न  जसे गरिबी,अज्ञान,निरक्षरता व अन्न समस्या याशिवाय अंधश्रद्धामध्ये समाज अडकून होता,  या सर्व समस्येतून समाजाला बाहेर काढण्यासाठी विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे याची जाणीव देशातील राज्यकर्त्यांना होती म्हणूनच विज्ञानावर आधारित समाजरचना व शिक्षण यावर भर देण्यात आला. भारतीय समाजव्यवस्थेत परंपरेने चालत आलेले सण व उत्सव यांच्या पाठीमागे आपल्या पूर्वजांचे विज्ञान होते ते समजावून घेतले पाहिजे. पर्यावरण संरक्षणाचा विचार करून त्या घटकांचा संबंध आपल्या सण-समारंभासी  जोडण्यात आलेला आहे, यावरून पर्यावरण संवर्धनाची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. देशात विज्ञानाच्या साह्याने हरित क्रांती, धवलक्रांती घडून आली. देशाचा औद्योगिक व तांत्रिक विकास झपाट्याने होत आहे परंतु हा विकास शाश्वत होणे गरजेचे आहे. 
     
 या कार्यक्रमाचे खूप सुंदर असे आभार कु.अंकिता बनगे ( बी.ए.भाग ३ ) हिने मानले. तर उत्साह निर्माण करणारे सूत्रसंचालन कु. भाग्यश्री बनकर ( बी.कॉम. भाग २ ) हिने केले. हा कार्यक्रम कोरोना नियमांच्या अधीन राहून यशस्वीपणे आयोजित करण्यात आले होते.यासाठी प्राध्यापक व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये विवेकवादी विचार निर्माण झाले.

Post a Comment

0 Comments