कोरोनाच्या उद्रेकानंतर सिरमच्या लसीची निर्यात थांबवण्याचा भारत सरकारचा निर्णय!


 देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या नवीन विक्रम नोंदवत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना चा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. 

 त्याचबरोबर महाराष्ट्र हे असे राज्य आहे, ज्याच्या अधिकाधिक जिल्ह्यांमध्ये वरचेवर लॉकडाउन चे निर्णय घेतले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशातील लोकांची लसीकरण करून घेण्याची गरज अधिक असल्याचे जाणून भारत सरकारने कोरोना लसीची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

 भारताने आतापर्यंत ७६ देशांना कोरोना लसीची निर्यात केली आहे. आतापर्यंत, भारत ही अशी शक्ती म्हणून समोर आलेला देश आहे जो कोरोनासारख्या महामारीवर संजीवनी म्हणून लसीचे उत्पादन करून इतर देशांना मदत कार्य करत होता. मात्र, आता आपल्या देशाची गरज समजून आणि वाढता उद्रेक लक्षात घेता आपले नागरिक आणि त्यांचे आरोग्य प्रथम प्राधान्य आहे, आणि त्यामुळेच भारत सरकारचा हा निर्णय योग्य आहे.

आता इथून पुढे भारत लसीची निर्यात करणारच नाही असा भाग नाही. मात्र, येत्या दोन महिन्यांमध्ये देशातील परिस्थिती आणि एकूण लसीचे उत्पादन याचा अंदाज बांधून ती आकडेवारी समोर ठेवून नंतर निर्यातीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

 सरकारने एस्ट्राझेनकाच्या कोरोना लसीच्या निर्यातीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड ही लस भारतातून अनेक देशांना पुरवण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाठिंब्याने GAVI अंतर्गत हा लशीचा पुरवठा करण्यात येतो. 

यामध्ये जगभरातील १८० हून अधिक देशांना लस पुरवण्याचे लक्ष्य आहे. भारताने जगातील अनेक देशांना ६० मिलियन डोसचा पुरवठा केला आहे. यातील ८.५ मिलियन डोस हे मदत म्हणून देण्यात आले आहेत. तर ३४ मिलियन डोस कमर्शियल म्हणून दिले आहेत.

Post a Comment

0 Comments