दंगल गर्ल गीता फोगटच्या बहिणीची आत्महत्यादंगल चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेल्या फोगट कुटंबात आज आत्महत्येची दुर्देवी घटना घडल्याने खळबळ माजली आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची मामे बहिण रितिका फोगटने आत्महत्या केल्याने सारे सुन्न झाले आहेत.

रितिका फक्त १७ वर्षांची होती. भारतपूर येथे गेल्या बुधवारी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचल्यान रितिकाने आत्महत्या केली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रितिकालाही फोगाट बहिणींप्रमाणे कुस्तीपटू बनायचं होतं. त्यासाठी ती गेली ५ वर्षे तिचे मामा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांच्या अकादमीमध्ये सराव करत होती. तिने नुकतंच भरतपूरमधील लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्थरीय सब-ज्यूनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव तिच्या जिव्हारी लागला आणि तो सहन न झाल्याने तिने सोमवारी रात्री खोलीतील पंख्याला ओढणी बांधून फाशी घेतली.

 रितिकाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केला. रितिकाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments