पवारांचे धक्कातंत्र, थेट 'या' नेत्याला पंढरपूर पोटनिवडणूकीसाठी केली लढण्यासाठी विचारणा


 “पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर आता ता जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. त्यामुळे या निवडणुकीतही ते धक्कातंत्र वापरणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण खुद्द पवार यांनी एका नेत्याला निवडणुकीत उभा राहण्यासाठी विचारणा केली आहे.

 पक्षांकडून उमेदवाराबाबत अनेक नावे चर्चेत येत असतानाच त्यामध्ये डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे देखील नाव या चर्चेत आले. निवडणूक लढविण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी वरील माहिती दिली. अभिजित पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी साखर कारखानदारीतील अडचणीसंदर्भात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या निवडणुकीसाठी उभारणार काय? अशी मला विचारणा केली. त्यावर आपण होकार दिला आहे; परंतु त्यासाठी त्यांनी पक्षाकडून सर्वच इच्छुकांकडून याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणात पसंती मिळालेल्या इच्छुकांमधूनच उमेदवार निश्‍चित केला जाणार आहे, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments