शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांची बंडखोरी पंढरपूर निवडणूकीसाठी अपक्ष अर्ज


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस साठी जागा सोडण्यात आली आहे. मात्र शिवसेना महिला आघाडी प्रमुख शैलाताई गोडसे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैलाताई गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत पंढरपूर येथील प्रांत कार्यालयात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. 
जनतेच्या दवाबमुळे अपक्ष उमेदवारी अर्ज..

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा शिवसेनेचे हक्काची जागा आहे. २०१९ साली शिवसैनिककडून मला उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखत झाली होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे २०१९ आली मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. मात्र सध्याच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या दबावामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती शिवसेनेचे बंडखोर नेत्या शैला गोडसे यांनी दिली..

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार असतील तरी आता माघारी नाही

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पवर पवार यांच्या नावाची पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली तरी आपण अपक्ष म्हणून लढणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे मराठी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली.

पंढरपूर मंगळवेढा शहरातील विकासासाठी उमेदवारी..
पंढरपूर मंगळवेढा शहरात गेल्या अनेक वर्षापासून विकास झालेला नाही. येथील नागरिकांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पंढरपूर मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पक्षाच्या विरोधात जाऊन काम करावे लागले तरी चालेल मात्र पंढरपूर मंगळवेढा येथील नागरिकांचा आवाज विधानसभेपर्यंत पोचवायचा आहे असे प्रतिपादन गोडसे यांनी केले.

Post a Comment

0 Comments