सध्या ऐन उन्हाळ्यात राज्याचे राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारला विरोधक धारेवर धरण्याचे काम करत आहेत. पुजा चव्हाण प्रकरनानंतर हिरेन प्रकरणाने आघाडी सरकारला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. आत्ता दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण देखील त्याच वळणावर जात आहे, सध्या असे चित्र दिसत आहे.
त्याचबरोबर रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक मंत्र्यांचे फोन टॅपिंग करून गुप्त माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने शुक्ला प्रकरण पुन्हा वेगळ्या वळणावर पोहचले आहे. आव्हाड म्हणाले की रश्मी शुक्ला या भाजपचा एजंट म्हणून काम करत आहेत.
यावर राणेंनी शुक्ला यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. आणि आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांना फुकटचे मंत्रिपद भेटले आहे. त्यांनी जास्त वळवळ करू नये. जितेंद्र आव्हाड हे कशाच्या आधारावर शुक्ला यांच्यावर आरोप करत आहेत. घरात इंजिनियरला ओढून आणणारा हा कोणता मंत्री, हि त्यांची फुकटची वळवळ आहे. असा घणाघात राणेंनी आव्हाड यांच्यावर लगावला आहे.
0 Comments