धक्कादायक! नागपूरच्या विवाहितेवर नवऱ्यासह दिर अन् सासऱ्याने केला बलात्कार, गुन्हा दाखलनागपूर शहराच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडेवाडी परिसरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत काहींनी तिला एक लाख साठ हजारांत विकले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील जगदीश सुका पाटील नावाच्या व्यक्तीशी लग्न लावून दिले. मात्र, त्या ठिकाणी संसार सुरू करताच पीडित तरुणीवर तिच्या नवऱ्याने, दिराने आणि सासऱ्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. 

पीडित तरुणीने वडिलांशी संपर्क केल्यानंतर ही घृणास्पद घटना समोर आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून जळगावच्या पारोळा येथे गुन्हा दाखल झाला आहे. सध्या ही पीडिता नागपूरला परत आली आहे. ज्यांनी तिची विक्री एक लाख साठ हजार रुपयांमध्ये केली होती, त्यांच्या विरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात दलालांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने पीडित तरुणीने काही सामजिक कार्यकत्यांच्या मदतीने पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्यांनी माझी विक्री केली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना देखील शिक्षा मिळावी, अशी मागणी पीडितेने केली आहे.

Post a Comment

0 Comments