हुंडा घ्याल तर लग्न नाही लावणार,मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय


मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने  एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जे लोक हुंडा  घेतील त्यांच्या वधु-वरांचा विवाह लावला जाणार नाही. 

विवाहा बद्दलचे आव्हान

विवाहात वारेमाप खर्च करण्यापेक्षा अत्यंत साधेपणावे विवाह करावा, असे अवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, विवाहात हुंडा न घेण्याबाबत ११ ते २० मार्च या कालावधी जनजागृती करण्यात यावी यासाठी मोहिम राबवली जाणार आहे.

मौलाना उमरैन महेफूज रहेमानी यांनी याबाबत बोलताना सांगितले

 दहेज परंपरा ही समाजासाठी घातक आहे. यामुळे गोरगरीबांवर ताण पडतो.  इतकेच नव्हे तर अनेक मुली, महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मौलाना उमरैन महेफूज रहेमानी हे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव आहेत. 
 हुंडा न देण्याघेण्याविषयी जनजागृती ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

 अधिक माहिती

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील सुमारे ३५ जिल्ह्यांमधली ४०० मुस्लिम मुफ्ती, काझी, मौलाना आदी धर्मगुरुंनी याविषयी चर्चा केली. ही बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. 


Post a Comment

0 Comments