बार्शी व इतर ठिकाणच्या पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असणारा व दहा मोटर सायकल चोरणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांनी केली अटकबार्शी/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यात वाढते मोटर सायकल चोरीचे प्रमाण लक्षात घेऊन,सोलापूर पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते व अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी चोरीतील मुख्य आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना  २१-०३-३०२१रोजी पंढरपूर येथे या आरोपीकडे चोरीच्या गाड्या आहेत अशी माहिती मिळताच यांनी सथानिक गुन्हा शाखेचे पोह. राजेश गायकवाड व त्यांच्या पथका मार्फत एकूण ४ लाख ३० हजार किमतीच्या दहा मोटर सायकली जप्त करण्यात आल्या. 

सदर आरोपीवर सध्या बार्शी शहर पोलिस स्टेशन मध्ये १४८/२०२१ भा. द. वी. क ३७९ हा गुन्हा नोंद आहे तसेच सदर आरोपी हा कुर्डवाडी सांगोला पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी देखील आहे सदर आरोपीवर दौंड,पुणे ग्रामीण, कोरेगांव पोलिस स्टेशन सातारा,मिरज पोलिस स्टेशन सांगली,शिवाजी नगर नांदेड, कराड पोलीस स्टेशन सातारा,या पोलीस स्टेशन मध्ये सुधा या आरोपीवर वेग वेगळे गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

0 Comments