प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय बार्शी शाखेच्या वतीने धिरज शेळके विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित...

बार्शी/प्रतिनिधी:

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय बार्शी शाखेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त बार्शी शहर आणि तालुक्यात विविध क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय समाज कार्य केलेल्या व्यक्तींचा विशेष गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा गौरव सोहळा बार्शी येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व् विद्यालयाच्या सभागृहामध्ये, कोरोना महामारी संदर्भातील सर्व नियम व अटींचे पालन करत मोठ्या उत्साहात पार पडला. 

कार्यक्रमाची सुरुवात वंदन गीत गाऊन करण्यात आली तर विदयालयाच्या ध्वजाचे ध्वजारोहणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवनेरी पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष धिरज शेळके यांना शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता कार्याबद्दल विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बार्शी शाखाधिकारी मिरा कत्ती यांना बँकिंग व सामाजिक कार्याबद्दल, माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष देवकीनंदन खटोड यांना सामाजिक कार्याबद्दल, लायन्स क्लबच्या अध्यक्षा सीमा काळे यांना महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्याबद्दल तर सिनेअभिनेते  अभय चव्हाण यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

याप्रसंगी विद्यालयाच्या शिक्षिका दीदी राजयोगिनी ब्रम्हाकुमारी संगीता बहनजी, बार्शी वकील संघांचे अध्यक्ष ऍड. काकासाहेब गुंड, मातृभूमी प्रतिष्ठानचे जॉईंट सेक्रेटरी मुरलीधर चव्हाण आदी मान्यवरांसह विद्यालयाच्या शिक्षिका, विद्यार्थिनी आणि विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रम्हाकुमारी अनिता बहनजी करवा यांनी केले तर उपस्थितांचे आभार ब्रम्हाकुमार विलासभाईजी जगदाळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments