नवा प्लॅन? गृहमंत्रिपदाच्या स्पर्धेत शरद पवारांचे विश्वासू माणूस पुढे "यांचे" नाव पुढे


 गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेण्यात आला तर गृहखात्याची जबाबदारी राष्ट्रवादी कोणाकडे देणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली असून काही नावे समोर आली आहेत.

गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या गोटातून सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे हेदेखील या पदासाठी स्पर्धेत आले. मात्र गृहखात्यावरून राज्यात इतका मोठा गदारोळ झाला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणतीही रिस्क घेणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर गृहमंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील  यांचं नाव पुढे आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बचावणे आणि वादापासून दूर राहणे ही वळसे पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत 'इंडिया टुडे'नं वृत्त दिलं आहे.

Post a Comment

0 Comments