पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने आपल्या ३० स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर



काँग्रेसचं मिशन पश्चिम बंगाल!

पश्चिम बंगालमध्ये निवडणूका होत आहेत. भाजपाने गुरुवारी ११ मार्च रोजी आपल्या स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत काँग्रेसने देखील आपल्या ३० स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पक्षातल्या अनेक दिग्गज नेतेमंडळींचा समावेश आहे.

भाजपाने एकच दिवस आधी आपली स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, नुकतेच भाजपवासी झालेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती नितीन गडकरी, स्मृती इराणी अशा एकूण ४० दिग्गजांचा समावेश आहे.

भाजपाच्या या प्रचारकांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून खुद्द सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत, सचिन पायलट, नवज्येत सिंग सिद्धू, कमलनाथ, भूपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंग अशी मोठमोठी नावं देखील आहेत

Post a Comment

0 Comments