कोरोना महामारीत 'भारतीय डाक' सेवा सुसाट!



लेखन : पूजा आनंदराव नारकर

२०२० च्या मार्च महिन्यापासून महाराष्ट्राबरोबरच इतरही अनेक राज्ये, शहरांमध्ये 'कोरोना' या भयंकर विषाणूने थैमान घातले. खरं तर हा आरोग्याशी निगडीत प्रश्न! याचा पोस्ट विभाग अणि त्याच्या अर्थव्यवस्थेशी थेट संबंध नाही. तथापि, या विषाणूचा कहर इतका प्रचंड आहे की त्यामूळे जगातील सर्व व्यवहार ठप्प झाले अणि अर्थव्यवस्था कोलमडली.

या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'लॉकडाउन' जाहीर करण्यात आला. काही आपातकालीन सेवा वगळता सर्व काही थांबले होते. 'भारतीय डाक सेवे'चा आपातकालीन सेवेमधे समावेश होता. त्यामुळे पोस्ट विभागाने कोरोना महामारीला न घाबरता योग्य ती काळजी घेउन, मास्क व सॅनिटाइजरचा वापर करुन आपले अखंड सेवेचे व्रत बजावले.

पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक (जी.डी.एस.) हा भारतीय डाक विभागातील सर्वात लहान घटक. बँकांच्यापेक्षाही भारतीय डाक विभागाचे जाळे आज देशाच्या कानाकोपर्यात पसरले आहे.पोस्टमनच्या माध्यमातून डाक विभाग प्रत्येकाच्या घरात पोहचला आहे. पोस्टमन म्हणजे खाकी ड्रेस, हातात टपालची पिशवी, डोक्याला टोपी असं काहिसं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. मात्र आज हे चित्र बदललं आहे. आज पोस्टमन फक्त टपाल वाटपाचं काम करत नाही तर ते बँकांप्रमाणे कार्यरत आहे. बचतीसाठी या विभागाच्या विविध योजना आहेत. तसेच २०१८ ला पोस्टाने 'इंडिया पोस्ट पेमेंट बँक' सुरु केली. ज्यामुळे सर्वसामान्य लोकाना ऑनलाइन व्यवहार करणे सुलभ झाले. आधार इनेबल्ड पेमेंट सर्विस च्या माध्यमातून फक्त आधार क्रमांक व बोटांच्या ठशाद्वारे आधार कार्ड लिंक असलेल्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतुन देशातील कोणत्याही पोस्टातून पैसे काढणे शक्य झाले. पोस्टाच्या याच आधुनिकीकरणाचा फायदा कोरोना महामारीच्या काळात झाला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना त्यांची बचत पोस्टात सहज उपलब्ध झाली.याच संकटात मदत म्हणून सरकारने महिलांच्या बचत खात्यावर १५०० रुपये जमा केले. हे पैसे देखीललोकांना पोस्टात AEPS द्वारे मिळाले. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांची शिष्यवृती तसेच पेन्शनधारकांची पेन्शन ही पोस्टाच्या आय.पी.पी.बी. या ऑनलाइन बैंकिंगच्या खात्यावर जमा झाली. मुंबई ,पुणे येथे नोकरी निमित्त राहनार्या गावाकडील लोकांना जीवनावश्यक वस्तू देखील पोस्टामार्फत पोहोच झाल्या. लॉकडाउनच्या काळात वाहतुक व्यवस्था बंद होती. अशावेळी पोस्टमननी स्वखर्चाने सबऑफ़िस मधुन टपाल आणले. मेडिकल व डायग्नॉस्टीक ची सेवा घरपोच दिली. अनेकदा औषधं सुध्हा पोहचवली. एवढेच नव्हे तर , आय.सी.एम.आर. ने पोस्ट विभागासोबत एक करार केला. ज्यामार्फत कोरोना चाचणी कीट्सची डिलीवरी करायला पोस्ट विभागाने मदत केली. ज्यामधे पोस्टला ठरवून दिलेल्या २०० अतिरिक्त लॅब्ससाठी कोरोना चाचणी कीट्सची डिलीवरी करण्यात आली.

या जागतिक मारामारीच्या काळात 'सोशल डिस्टंसिंग' महत्वाचे आहे. कोणाच्या घरी कोरोना पेशंट सापडला तर त्यांना अक्षरशः वाळीत टाकलं जायचं. मात्र अशा काळात पोलिस, डॉक्टर , पोस्टमनसारखं तसेच त्यांच्या कुटुंबियांनी माणुसकीच्या नात्याने आपला जीव धोक्यात घालून सर्वांची सेवा केली . याचं फलित म्हणून ऑकटोबर मधे हेल्थगिरीमार्फत "बेस्ट लाॅजिस्टिक्स सर्वीस प्रोवाइडर" हा पुरस्कार "भारतीय डाक विभाग, संचार मंत्रालय" ला मिळाला. त्यांच्या सेवेची ही पोचपावतीच होय. आज या आजारावरची लस आली आहे. मात्र या महामारीमधे अनेकांना कर्तव्य बजावताना आपले प्राण गमवावे लागले. त्या सर्वांच्या सेवाभावी वृत्तीला सलाम!

Post a Comment

4 Comments

  1. खरच पोलिस, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी यांच्यासोबत पोस्टमन आणि इतरही अनेक लोकांनी आपले जीव धोक्यात घालून लोकांना मदत करण्यास प्रथम कर्तव्य मानले आणि म्हणूनच सामान्य जनतेने lockdown मध्ये सुद्धा घरात मोकळा श्वास घेतला.
    Well said pooja 💯❣️💫

    ReplyDelete