बार्शी! दिलीप सोपल यांनी घेतली कोरोनाची लस


बार्शी/प्रतिनिधी:

 माजी मंत्री आणि शिवसेना नेते दिलीप सोपल यांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. शहरातील सुविधा हॉस्पिटल येथे जाऊन त्यांनी कोरोना लस घेतली, तसेच बार्शीतील ज्येष्ठ नागरिकांनाही लस घेण्याचं आवाहन केलंय. यावेळी डॉ. कैवल्य गायकवाड,हॉस्पिटल चे व्यवस्थापक नितीन आवटे अरुण कापसे संतोष सूर्यवंशी यांसह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला या महिन्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच, ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या आणि गंभीर व्याधीने ग्रस्त असलेल्यानाही लस टोचण्यात येत आहे. त्यानुसार, शहरातील ग्रामीण रुग्णालय, जगदाळे मामा रुग्णालय, कँसर हॉस्पिटल, सुविधा हॉस्पिटल, अंधारे हॉस्पिटल येथे कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. खासगी रुग्णालयात नोंदणीनंतर २५० रुपये घेऊन ही लस देण्यात येत आहे.

दरम्यान, बार्शीतील ज्येष्ठ नागरिकांनाही लस घेण्याचं आवाहन सोपल यांनी केलं आहे. तसेच, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मास्क वापरून काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केलीय.

Post a Comment

0 Comments