…म्हणून महिला पोलिसाने दिली आपल्या पतीची सुपारी


पालघरमधील मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस खात्याला काळिमा फासणारी घडना घडली आहे. महिला पोलिसानेच आपल्या प्रियकारासह सुपारी देऊन तिच्या पतीला संपवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पत्नी आणि प्रियकरासह तीन जणांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित पोलिस महिलेचा नवरा रिक्षाचालक होता.

 रिक्षाचालकाच्या पत्नीने अनैतिक संबंधातून कट रचून त्याची हत्या केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे. रिक्षाचालकाची पत्नी ही वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्याच पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यासोबत तिचे विवाहबाह्य संबंध होते.

पाच आरोपींनी खुनाचा कट रचला होता. महिला पोलीस आणि तिचा प्रियकर या दोघांनीही रिक्षाचालक याला मारण्याची सुपारी दिली आणि इतर तिघांनी रिक्षा प्रवासी म्हणून मनोर येथे ढेकाळे परिसरात रिक्षाचालकाला नेऊन त्याच्या डोक्यात लोखंडी राॅडने वार करुन त्याची हत्या केली असल्याचे तपासात समजल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, तपासात मृत पुंडलिक पाटीलच्या पत्नीने अनैतिक संबंधातून सुपारी देऊन खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिक तपास करुन इतर पुरावे पोलिसांनी जमा केले. खून करण्यासाठी मृत रिक्षाचालक पुंडलिक पाटील याला मुख्य तीन आरोपींनी दोन वेळा मनोर परिसरात भाड्याने आणले होते. तिसऱ्यांदा रिक्षा भाड्याने मिळावी यासाठी त्यांनी त्याला फोन केला होता.

Post a Comment

0 Comments