लॉजवर नेऊन विवाहितेवर सामूहिक बलात्कार, तीन जणांवर गुन्हा दाखलपुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात कुरकुंभ येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका लॉजवर नेऊन एका महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या घटनेतील धक्कादायक बाब अशी की, या प्रकरणात एका महिलेचाही समावेश आहे. दौंड पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

याबाबत पीडित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने दौंड पोलीसांनी एका महिलेसह दोन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल रोहिदास चौधरी, देविदास केरबा पवार आणि रज्जया सय्यद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

घटना अशी घडली -

पोलिसांनी दिलेली माहिती असी की, बुधवारी ४० वर्षीय आरोपी महिलेने पीडित महिलेला बचत गटाचे काम आहे असे सांगून मारुती कार (क्रमांक एम, एच, १२ पी. एच. १७२७ ) या गाडीमध्ये कुरकुंभ येथील महाराजा लॉजवर नेले. यावेळी पीडित महिलेने तू मला येथे कोठे आणले आहे, मी माझ्या नवऱ्याला सांगते असे म्हणाली असता, आरोपी महिलेने पीडित महिलेला शांत बस असे म्हणून लॉज मधील एका रूममध्ये नेले. पीडीत महिलेला मारहाण करून येथून कोठेही जायचे नाही, गप्प बसून राहा असे म्हणून ती तेथून निघून गेली. गाडीमधील नराधमांनी ओरडाओरड करायची नाही, जर केला तर तुला जिवंत ठेवणार नाही, असा दम देवून दोघांनी या महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला.

Post a Comment

0 Comments