जल है तो कल है..!

परंडा/रणजीत पाटील:

आज जागतिक पाणी दिवसाचे अवचित्य साधून नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी यांच्या वतीने "कॅच द रेन" कार्यक्रम साजरा करण्यात आला.

 संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे, पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.

जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे त्याकरिता जल संधारण काळाची गरज ठरत आहे.
पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी,योग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे जागतिक पाणी दिवस निमित्ताने  श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत पाटील यांनी बोलताना  सांगितले.

Post a Comment

0 Comments