अपघातात आई-मुलाचा मृत्यू! एकाचवेळी निघालेल्या अंतयात्रेने सारे हळहळले


 राष्ट्रीय महामार्गाच्या संथगतीच्या कामामुळे एका शिक्षिकेला आणि तिच्या मुलाला जीव गमवावा लागला.
शाळेेत शिकवणाऱ्या कविता चौधरी नावाच्या शिक्षिका आपल्या मुलाला घेऊन शाळेकडे निघाल्या. वाटेत त्यांनी गाडीतले पेट्रोल संपले म्हणून गाडी पेट्रोलपंपाकडे वळवली. पेट्रोल पंपावरून निघाल्यावर काहीच अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर चौपदरी करनाचे काम चालू होते. त्यातच कविता चौधरी यांच्या गाडीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

या अपघातात आई मुलाचा जागीच मृत्यु झाला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. स्थानिकांनी यानंतर गर्दी केली. राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने काम चालू असल्याने हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आणि सहाय्य निरीक्षक तुषार देवरे घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात घेऊन गेले.

दरम्यान, कविता चौधरी आदिवासी वस्तीतील शाळांमध्ये शिकवत होत्या. मुलांना स्वच्छ पाणी मिळावे त्यासाठी त्यांनी शाळेत स्वखर्चाने शाळेत प्युरीफायर बसवले होते. तर शाळेच्या परिसरात मुलांना चांंगल्या सोई सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळे त्याच्या जाण्याने विद्यार्थांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments