भाजपाचा ‘हा’ बडा नेता अडचणीत !




 सहकार विभागानं मुंबई बँकेचं सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतल्यानं मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नाबार्डच्या २०१८-१९ च्या अहवालात बँकेच्या कामकाजावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

मागील पाच वर्षात बँकेची संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्यावर, हार्डवेअर खरेदी, देखभाल यावर झालेल्या खर्चाची तपासणी, मालमत्ता दुरुस्ती व नुतनीकरणासाठी केलेल्या खर्चाची तपासणी, कार्पोरेट लोन पॉलिसी अंतर्गत दिलेल्या व वसुल न झालेल्या थकीत कर्ज खात्यांची तपासणी, बँकेने स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थाना दिलेल्या कर्जाची तपासणी, आपल्या कार्यक्षेत्राबाहेर बँकेने दिलेल्या व वसूल न झालेल्या कर्जाची तपासणी, अनुत्पादित वर्गवारीतील तसेच गैरव्यवहारातील सोने तारण कर्ज खात्याची तपासणी, मंजूर संस्थांना दिलेल्या आणि वसुल न झालेल्या कर्जाची तपासणी, बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या कर्ज खात्यांची तपासणी,सभासद सहकारी संस्थांना दिलेल्या कर्ज खात्यांची तपासणी या सर्व बाबींचे एका महिन्यात ऑडीट करण्याचे सहकार विभागाने ऑडिटरला दिल्या आहेत. 

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही भाजपच्या ताब्यात असून प्रवीण दरेकर बँकेचे अध्यक्ष आहेत.

 

Post a Comment

0 Comments