रिषभ पंत साठी गुड न्यूज; थेट कर्णधारपदी झाली निवड!


भारतासाठी कोणताही खेळ खेळताना आपण आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन त्याचे प्रतिनिधित्व करावे असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते. क्रिकेट हा तर भारताचा धर्म आहे, असे म्हणतात. क्रिकेटमध्येही अनेक लोक आपले नशीब आजमावतात.

मात्र, काही जणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते. त्यात भारतीय संघाचे खेळाडू म्हणून खेळण्यात एक वेगळाच अभिमान त्या खेळाडूला असणार यात वादच नाही. रिषभ पंतला त्याची चांगली कामगिरी आता यशाची गोड फळे चाखवत आहे, असे म्हणावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या तीनही सीरिजमध्ये धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर, रिषभ पंत चांगला फॉर्ममध्ये आला आहे, दिल्ली कॅपिटल्स च्या संघाच्या कर्णधारपदी त्याची नियुक्ती झाली आहे.

आयपीएल १४ या मोसमाला ९ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स कडून त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्स पूर्व कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने रिषभ पंत कडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments