"अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांचा यशस्वी कोल्हापूर दौरा: आरोग्यराज्यमंत्री यड्रावकर यांचेशी सदिच्छा भेट"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांचा सामाजिक व अन्य प्रश्नाच्या अनुषंगाने कोल्हापूर दौरा काढण्यात आला होता या दौऱ्याच्या दरम्यान त्यांचा अनेक घटकांशी संवाद झाला.
       
मानवहित लोकशाही पक्षाचे प्रमुख नेते सचिनभाऊ साठे यांनी कोल्हापूर दौराच्या निमित्ताने ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याशी कागल तालुक्यातील समाज बांधवांच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने  सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर शहरातील सर्किट हाऊस मध्ये समाज बांधवांशी राजकीय, सामाजिक व अन्य प्रश्नावर चर्चा केली तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचे त्यांनी सत्कार केले.
              
यानंतर शिरोळ तालुक्यातील नांदणी या  गावात कालकथित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांनी तेथील समाज बांधवांशी विविध प्रश्नावर चर्चा केली.
          
या दौऱ्याचा शेवटचा भाग म्हणून राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर  यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्याशी शिरोळ तालुक्यातील समाज बांधवांच्या अनेक प्रश्नावर सांगोपांग चर्चा केली त्याचबरोबर शिरोळ तालुका मातंग समाज बांधवासाठी हक्काचे सांस्कृतिक भवन शिरोळ शहरामध्ये व अण्णाभाऊ साठे यांच्या नावे जांभळी गावांत सार्वजनिक वाचनालय असावे याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
         
मुळात महाराष्ट्रातील अनुसूचित जाती या प्रवर्गात एकूण ५९  जाती असून मातंग समाजाची  अनुसूचित जाती मधील एकूण टक्केवारी २०.३% आहे. मात्र अनुसूचित जातीचे सर्वात अधिक लाभ त्या प्रवर्गातील इतर जाती घेत आहेत. इतर जातींची प्रगतीही झाली पाहिजे याबाबत आमचे दुमत नाही परंतु इतर जाती प्रमाणे  मातंग समाज हा हजारो वर्षापासून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्यामुळे समाजाची सामाजिक व आर्थिक प्रगती झाली नाही त्याचबरोबर समाजाला हक्काचा व समाजासाठी एक झटणारा नेता मिळाला नाही परंतु अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ यांच्या रूपात नेता मिळाला आहे. समाजबांधवांच्या सर्व पातळीवर विकासासाठी चंग बांधून परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी त्यांनी मानव मानवहित लोकशाही पक्षाची स्थापना केली आहे. परंतु अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ असणाऱ्या परिसरात वेगाने प्रगती झाली नाही परंतु सचिनभाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांना न्याय व हक्क देण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य दौरे सचिनभाऊ यांनी पूर्ण केले त्याच दौऱ्याचा एक भाग म्हणून कोल्हापूर दौरा हा नियोजित होता.या दौऱ्याच्या निमित्ताने असंख्य समाजबांधवांची सुखद चर्चा झाली समाजबांधवांना देखील प्रचंड आनंद झाला असून आपल्याला खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देणारा नेता सचिनभाऊ यांच्या रूपात मिळाला आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया या दौऱ्यादरम्यान दिसत आहे.
       
या कोल्हापुर दौऱ्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्ष नेहा साठे  या भगिनी, पुरुष जिल्हाध्यक्ष संदीप आवळे, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद मोहिते कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव शशिकांत घाटगे, संदीप बिरांजे अविनाश बिरांजे सागर बिरांजे काजल बिरांजे कोमल मोहिते वासंती मोहिते व ग्रामपंचायत सदस्य दिपक कांबळे हे मान्यवर  व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments