वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी आज विधानसभेत केली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून सभागृह दणाणून सोडलं. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये मुद्दा उपस्थित करत या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलावा अशी मागणीही त्यांनी केली.
0 Comments