सचिन वाझे प्रकरणाचा परिमाण महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही - शरद पवार



 सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असतानाच, सचिन वाझे प्रकरणाचा परिमाण महाविकास आघाडी सरकारवर होईल, यावर आमचा विश्वास नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार म्हणाले की, एका पोलीस अधिकाऱ्याच्या तपासाचा परिणाम सरकारवर होईल यावर आमचा विश्वास नाही. एनआयए याचा तपास करत आहे. त्यावेळी आमचं काम आहे त्यांची मदत करणे. ज्या लोकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, त्यांना त्याची जागा दाखवणं यासाठी एनआयए तपास करणार यात काहीही चुकीचं नाही.

केरळमधील काँग्रेसचे नेते पी.सी. चाको यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments