माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी घेतली कोरोना लस


माढा/प्रतिनिधी:

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्याला नुकतीच सुरुवात झाली असून आज सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्नालयांमध्ये माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे व सौ. सुनंदा बबनराव शिंदे यांनी लस घेतली. 

रुग्णालयाच्या कर्मचारी उज्वला लांबतूरे यांनी लस दिली यावेळी डॉ. गुरुनाथ परळे उपस्थित होते.
हि लस घेण्यासाठी पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरच लस घ्यावी व कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन आ. बबनराव शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments