करमाळा येथे कोरोनाची दुसरी लाट होत आहे सक्रिय ; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन


करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा येथे तपासणी केलेल्या २० रुग्णांपैकी सात जणांना करुणा ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून मिरगव्हाण येथील एका व्यक्तीचा  कोरोनावर उपचार घेत असताना बार्शी येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला करमाळा शहरातील झपाट्याने कोरूना वाढत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

कोरूना संपत चालला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण झपाट्याने वाढ होत असून आज तपासणी करणार्‍या २० जणांपैकी सात जण पॉझिटिव आल्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत बोलताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल डुकरे म्हणाले, की करमाळा शहर व तालुक्यातील जनता पाहिजे तेवढी काळजी घेत नाही आजचा आलेल्या रिपोर्ट मुळे आम्ही सुद्धा हादरून गेलो. रोज तपासणी संख्या वाढली तर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना कॅरियर व्यक्ती फिरत असल्याचे दिसून येत आहे, आता जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. ६० वर्षावरील नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी जेऊर व कोर्टी या दोन ठिकाणी केंद्रे उभारली भरले, असून करमाळा कुटीर रुग्णालयात न कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे या ठिकाणी अजून सुरुवात केली नाही.
(Advertise)

करमाळा शहर व परिसरात अशीच परिस्थिती राहिल्यास पुन्हा एकदा आपल्याला लाकडांचा दिशेने वाटचाल करावी लागेल, मिरगव्हाण येथील एक व्यक्ती बार्शी येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता गेली बारा दिवसांपासून त्याच्या उपचार चालू होते आज त्याचा दुर्दैवी अंत झाला या घटनेमुळे ही करमाळा शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments