बार्शी कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात एक ठार


 बार्शी/प्रतिनिधी :

बार्शी कुर्डवाडी रोड वर भीषण अपघात अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी. बार्शी कुर्डवाडी रोडवर दुपारी सुमारे १२ वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झालेला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये एक आयशर चालक जागेवर ठार झालेला असून, दुसरा टिप्पर चालक गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे समोरासमोर धडक होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

त्यामुळे बार्शी कुर्डवाडी रोड वर होणारी वाहतूक देखील ठप्प झाली होती. घटनास्थळी स्थानिकांन धाव घेतली व तात्काळ बार्शी येथील तालुका पोलीस स्टेशन येथे कळविले असता, तालुका पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली,व पुढील कार्यवाही चालू आहे.

 

Post a Comment

0 Comments