प्रियकराचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरल्याने चिडलेल्या प्रियेसीने प्रियकरावर केला अॅसिड अटॅक


 प्रियकराचे  दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरले म्हणून, चिडलेल्या प्रेयसीने त्याच्यावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  आग्रा येथील हरीपर्वत परिसरात ही घटना घडली असून यात तरुणाचा मृत्यू झाला असून, देवेंद्र असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा कासगंजचा रहिवासी आहे

मिळालेल्या माहितीनुसार, हरीपर्वत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री नगरमध्ये एका घरातून सकाळी सात वाजताच्या सुमारास तरुणाच्या किंचाळण्याचा आवाज आला. ते ऐकून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. त्यावेळी तरुण अॅसिड हल्ल्याने गंभीररित्या होरपळला होता. तर महिलाही जखमी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही पोहोचले. त्यांनी तरुणाला रुग्णालयात नेले. जबाब नोंदवल्यानंतर काही वेळाने तरुणाचा मृत्यू झाला.

 पोलिसांच्या माहितीनुसार, महिला गेल्या अनेक वर्षांपासून पतीपासून वेगळी राहात आहे. ती येथे आपल्या दोन मुलांसह राहते. देवेंद्र आणि या महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह इनमध्ये राहतात. त्याचवेळी देवेंद्रच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न अन्य एका मुलीसोबत ठरवले. तोही लग्नाला तयार झाला होता. त्यामुळे महिला प्रचंड नाराज झाली होती. तिने पंखा दुरुस्त करण्यासाठी त्याला बोलावून घेतले. त्याच्या अंगावर अॅसिड फेकले. यात गंभीर होरपळल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्याचा मृत्यू झाला. महिलेच्या हाताला जखमा झाल्या आहेत. तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments