सोन्या-चांदीच्या भावात आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव काय


सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूक सोने हा उत्तम पर्याय असतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोन्यामध्ये सतत घसरण होत आहे, आणि त्यामुळे त्याचे दर खूप खालावले आहेत. सध्या चांदीच्या सुद्धा दरांमध्ये बरीच घसरण झाल्याचे पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय बाजाराचा जसा या भावावर फायदा होत असतो तसाच, स्थानिक उलाढाल यांचादेखील सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होत असतो.

मुंबई पुण्यामध्ये सोन्याच्या दरात १६०० रुपयांनी आणि चांदीच्या दरामध्ये ७०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४ हजार ७६० रुपये झाला असून, २३  कॅरेट चा भाव ४३ हजार ७६० आहे. चांदीसाठी आता ६५ हजार मोजावे लागणार आहेत.

गेल्या आठवड्यात बुधवारी १ हजार रुपयांनी सोन्याचे दर वाढले मात्र, त्यानंतर प्रत्येक दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. १ फेब्रुवारी रोजी ४९ हजार ४५० इतका सोन्याचा भाव होता. MCX या कमोडिटी मार्केट कडून मुंबईतील सोन्याचा भाव ठरवला जातो. त्यावर लागणारा टॅक्स आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन, आणि आंतरराष्ट्रीय बाजाराची हालचाल पाहून सोने-चांदीचे दर खालीवर होत असतात.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने ५६ हजारांचा आकडा पार केला मात्र त्यानंतर सतत सोन्याची घसरण आपल्याला पाहायला मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments