कोळगाव धरण उशाला, करमाळाकरांच्या कोरड घशाला; संजय(बापु)घोलप मनसे घेणार आक्रमक भूमिका


 करमाळा/प्रतिनिधी:
                 
तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी राजाची वरदायिनी ठरलेलं कोळगाव धरणातून जलसाठा सोडून दिला असल्याचे खात्रीलायक माहीत समोर आली आहे .दर दिवसाला दहा फूट पाण्याची पातळी खाली जात असल्याचे चित्र येथील शेतकरी उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. त्याचा फटका बोरगाव, करंजे, भालेवाडी, दिलमेश्वर, वाघाची वाडी, खांबेवाडी आदी गावांना बसणार आहे .सहा ते सात वर्षातून कधी नव्हे, या वर्षी हे धरण काही प्रमाणात भरले होते .याच धरणाच्या आशेवर येथील शेतकरी वर्गाने कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या आहेत .यावेळी उसाची लागवड भरपूर प्रमाणात झाल्याने पहिले पाढे पंचावन्न अशी गत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे .त्यामुळे हे सोडलेले पाणी त्वरित बंद करून, या परिसरातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून याचा जाब शासनाला व संबंधित अधिकारी यांना द्यावा लागेल. अशी ठोस भूमिका मनसे तालुका अध्यक्ष श्री संजय बापू घोलप यांनी घेतलेली आहे.

           
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे, ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप,  म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड, जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.सचिन कणसे, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे, शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य कांबळे, जि.म.न.वि.से प्रसिद्धी अध्यक्ष मा.महेश डोके मा.अनिल माने  योगेश काळे, अमोल जांभळे, राजा कुभांर, विजय हजारे, योगेश काळे, स्वप्निल कवडे. 

Post a Comment

0 Comments