"विनाकारण वाहन अडविण्याचा नाही वाहतूक पोलिसांना अधिकार" - पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेसोलापूर/प्रतिनिधी:

नाकाबंदी अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर केसेस करण्यापूर्वी त्यांची सर्वप्रथम नोंद पोलिस ठाण्याच्या दैनंदिनीत करून कंट्रोल रूमलाही कळविणे बंधनकारक असते, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले. 

महामार्ग असो वा राज्य मार्गांवर नाकाबंदी करण्यापूर्वी संबंधित पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलिस मुख्यालयास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. नाकाबंदी सुरू असताना डमी वाहनचालक पाठवून पोलिस उपअधीक्षकांकडून कार्यवाहीची पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहन वेडेवाकडे चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट अथवा नंबरप्लेटच नाही, अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर निश्‍चितपणे कारवाई करावी. ते नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे डोळ्यांनी स्पष्टपणे दिसते. मात्र, दुसऱ्या वाहनांना अडविताना कंट्रोलची परवानगी घ्यावीच लागेल, असे स्पष्ट निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. 
(Advertis)

विनाकारण वाहन अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते. काही ठिकाणी गैरप्रकाराच्या तक्रारीही ऐकावयास मिळतात. 

वाहनचालकांनी "या' नंबरवर करावी तक्रार 
महामार्गांवर तथा राज्य मार्गांवर सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार विनाकारण दुचाकी, चारचाकी अथवा परराज्यातील वाहने अडवून त्यांना त्रास देत असल्यास संबंधित वाहनचालकांनी 0217-2732000 व 0217-2732009 आणि 0217-2732010 या क्रमांकांवर संपर्क करावा. तर 7264885901 आणि 7264885902 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावरही फोटोद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे. 

 

Post a Comment

0 Comments