“....म्हणून देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”


प्रसिद्ध स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा हा नेहमी वेगवेगळ्या मुद्यांवरून सोशल मीडियावर चर्चेच असतात. त्याच्या भाजपविरोधी वक्तव्यामुळे तो नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना तो नेहमी निशाण्यावर घेत त्याच्यांची थट्टा करत असताना दिसतो. तर आता त्याने ट्वीट करत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केलं आहे.

त्या मृत्युनंतर नेमकं काय घडलं याबद्दल मी निश्चित नाही. या प्रकरणात पुढे काय होईल याची देखील मला खात्री नाही. तर उद्या या प्रकरणात काय समोर येईल सांगू शकत नाही. पण देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पुर्ण खात्री आहे, असं ट्विट कुणास कामरा याने केलं आहे.

 गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध झालेल्या भष्ट्राचाराच्या आरोपावरून राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे. तर फडणवीस यांनी डेटा बाॅम्बच्या प्रकरणावरून सरकारची गोची केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचे मंत्री फडणवीसांना लक्ष्य करून टीका करत आहेत.

दरम्यान, कुणाल कामरांसारखे अनेक काॅमेडियन राजकीय मुद्यांवरून भाष्य करताना दिसत आहेत. कुणाल कामराच्या एका ट्विटमुळे मध्यंतरी मोठा खळबळ उडाली होती. न्यायालयावर केलेल्या आक्षेपार्य ट्विटमुळे न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला होता.


Post a Comment

0 Comments