गुन्हगारी ! सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, तिघांवर गुन्हा दाखल...!


सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी राज्यात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असून पुणे पोलिसांनी या पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

  मिळालेल्या माहितीननुसार रविवारी म्हजेच २८फेब्रुवारी रोजी देशभरात सैन्य भरतीसाठी परीक्षा होणार होती.  मात्र, सैन्य भरतीचे पेपर आदल्या दिवशी फुटणार असल्याची खबर पोलिसांना लगली. त्यानंतर सापळा रचून गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. पुणे पोलिसांनी दोन टिकाणी समातंर पद्धतीने चौकशी केली. तसेच एकाला बारामती येथून ताब्यात घेतले. एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Advertise)

 सेवानिवृत्त अधिकऱ्याच्या मुलाने याबाबत तक्रार दिली होती. पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एकूण ३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.

नागपुरात आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ

दरम्यान, नागपूर येथे होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेतसुद्धा गोंधळ उडाला. प्रश्नपत्रिकेचे सील तुटलेले असल्यामुळे येथे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.तसेच येथे सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता.  परीक्षा पेपरचे सील तुटलेले कसे?, असा सवालाही विद्यार्थ्यांनी येथील प्रशासनाला केला.

Post a Comment

0 Comments